
वाळूजमहानगर, (ता.5) :- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक, गणितीय,भौगोलिक, भौतिक व कला अशा चौफेर विषयांचा दृष्टिकोन निर्माण व्हावा व त्यांनी निर्माण केलेले, रेखाटलेले, विविध जोडणीतून उभारलेले असे अनेक सुंदर प्रोजेक्ट या निमित्ताने प्रत्यक्षात यावे. असा एक उदात्त हेतू समोर ठेवून ‘भगवान महावीर स्कूल, बजाजनगर’ येथे विज्ञान, कला व गणितीय प्रदर्शन आयोजित केले होते.
कार्यक्रमाला उद्घाटक व अध्यक्ष म्हणून गरुड झेप अकॅडमीचे संचालक निलेश सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल सिंगी तसेच संचालक किशोर राका, संभाजी राचूरे उपस्थित होते.
प्रदर्शनांमध्ये ऑटोमॅटिक झेब्रा क्रॉसिंग, एस्क्युलेटर, ग्लोबल वार्मिंग, हवेचा दाब, जादूची शाई. असे वैज्ञानिक व तांत्रिक प्रोजेक्ट सादर केले. तर वातावरणातील स्तर, ब्लॅक होल, ओझोन लेयर असे भौगोलिक प्रोजेक्ट तसेच गणितीय प्रयोगही सादर केले. तसेच मराठी महिने व त्यात येणारे धार्मिक उत्सव यावर आधारित विविध रांगोळ्या विद्यार्थिनींनी रेखाटल्या. भारतातील पहिल्या कर्तबगार महिलांचा सुंदर देखावा शिक्षकांनी दाखवला. तसेच पुस्तकी जगाशी आपली नाळ पुन्हा जोडली जावी, पुस्तकांच्या या जगात विद्यार्थ्यांना फिरता यावे, दृष्टीने पुस्तकांचे प्रदर्शनही आयोजित केले गेले. असे विविध रंगी, विविध अंगी प्रदर्शन शाळेतील शिक्षक विशाल कामळे, येवेलकर रत्नमाला, गडेवर निकिता, पाटील स्वराली, दर्गुदे विजया, मैलारे अल्का, महाजन वर्षा, शिंदे अश्विनी, संगीता अव्ह्याळे यांनी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी सांगोले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा पवार यांनी केले.
…………… . …..
