
वाळुज महानगर, (ता.12) – मित्रासह चुलत भावाच्या हॉटेलवर जात असताना रस्त्यातच चार जणांनी एकास शिवीगाळ करत ब्लेडने वार करून व काचेच्या बाटलीने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (ता.10) रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास शिवराई येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवराई येथील आकाश विष्णू साबळे (28) व त्याचा मित्र रिशम असे दोघे मोटार सायकलवर शिवराई फाटा येथे अमोल साबळे याच्या हाटेलवर जात असतांना भारत हाटेल समोर असलेल्या जुनेद (पुर्ण नाव माहीती नाही), आलीम हाटेल चालक, आजीम (पुर्ण नाव माहीती नाही) व मुसा (चेअरमनचा मुलगा). सर्व रा. लिंबेजळगाव हे आले व तिघांनी आकाश साबळे याला एकदम मारण्यास सुरवात केली. आलीम याने त्याच्या हातातील ब्लेडने पाठीवर मारून जखमी केले व जुनेद याने माझ्या डोक्यात काचेची बाटली मारली. त्यामुळे आकाश साबळे याचे डोके फुटुन रक्त निघाले. आजीम याने लाथाबुक्याने मारहाण करीत असताना तेथे आलेल्या 5 ते 6 अनोळखींनीही त्याला लाथा बुक्याने मारहाण करुन जखमी केले. या प्रकरणी आकाश साबळे यांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
