February 5, 2026


वाळूज महानगर, (ता 15)- एससी, एसटी हब हैदराबाद व बिम्टा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योगाबाबत शनिवारी 17 जानेवारी रोजी आॅनलाईन जनजागृतीचे आयोजन करण्यात आले आहे.

बौद्ध इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स असोसिएशन (बिम्टा) च्या सदस्यांना माहितीसाठी एमएसएमई विकास कार्यालयाचे सहायक संचालक राहुलकुमार मिश्रा यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक नुकतीच झाली. यावेळी एमएसएमई उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना, नोंदणी प्रक्रिया तसेच उद्योजकांमध्ये जनजागृती करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत 30 किंवा 31 जानेवारी रोजी बौद्ध इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स असोसिएशन (बिमाटा) सदस्य व एमएसएमई उद्योजकांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कार्यक्रमाची अंतिम तारीख, वेळ व स्थळ लवकरच घोषित येईल. असे बिमटाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *