वाळूजमहानगर, (ता.27) – प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉ शिंदे व धन्वंतरी मेडिकल फाऊंडेशन यांच्या वतीने धन्वंतरी हॉस्पिटल भाजी मंडई, बिडकीन येथे भव्य मोफत नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरास परिसरातील खेडे व गावं, तांडा, वस्त्यावरील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या शिबिरास लायन्स नेत्रालय औरंगाबाद यांच्या वतीने डॉ. संदीप गायकवाड, डॉ. मंगेश देशमुख, सहाय्यक कांबळे, अमन सय्यद यांनी रुग्णांची तपासणी करून माफक दरात चष्मे वाटप केले. या शिबिरात 297 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. व 27 रुग्णांना मोतीबिंदू शस्रक्रिया करण्याकरिता लायन्स नेत्रालय औरंगाबाद येथे बोलवण्यात आले. या शिबिरा प्रसंगी सरपंच अशोक धर्मे, उपसरपंच विकास गोर्डे, खरेदी विक्री संचालक बबन ठानगे, ग्रा प सदस्य मधुकर, मिनाज इनामदार, मोहन हिवाळे, अमोल वंजारे, वामनदादा साठे, हाफीज इनामदार, विशाल हाडे, अप्पा पाटिल, पत्रकार अरुण देविदास, डॉ. त्रिम्बक पाडळकर, डॉ दीपक गायकवाड, बंटी वंजारे, विजय पडीयाल, संजय औटी, अब्दुल करीम, शशीकांत हिवाळे, अरुणा काळे, सोमनाथ पंडित, प्रिया सिस्टर, शिवानी सिस्टर यांच्यासह हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.
