February 4, 2026

वाळूज महानगर, (ता.11) – बिअरबार हॉटेलचे शटर उचकटुन अज्ञात आरोपींनी हॉटेलच्या काऊंटरमधील वेगवेगळ्या प्रकारची, कंपन्याची व कंपनीची बियर तसेच विदेशी दारुच्या 30 हजार 690 रुपये किमतीच्या बॉटल लंपास केल्या. ही चोरीची घटना छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवरील जिकठाण शिवारात शनिवारी 10 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, टेंभापुरी येथील कृष्णा कैलास गावंडे यांचे छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रोडवर गट नं-23, सुलतानपुर- जिकठाण शिवारात प्रेमराज बिअर बार नावाचे हॉटेल आहे. हे हॉटेल 10:30 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालु असते.

शुक्रवारी 9 जानेवारी रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास हॉटेल बंद करुन सर्वजण घरी गेले. दरम्यान रात्री अज्ञात चोरट्यांनी हॉटेलचे शटर उचकटून काऊंटर तसेच रॅकमध्ये ठेवलेल्या सिग्नेचर, रॉयल स्टॅग, इंपेरिअल ब्ल्यु, रॉयल चॅलेंज, टु बर्ग, बडवायझर, कार्ल्सबर्ग, ऑक्समिथ गोल्ड, ब्रॅन्ड मास्टर ओडका, रोमन ओडका अशा बियर तसेच विदेशी दारुच्या 30 हजार 690 रुपये किमतीच्या बॉटल लंपास केल्या.

शनिवारी 10 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास कर्मचारी अल्ताफ शेख हा हॉटेल उघडण्यासाठी आला असता ही चोरीची घटना उघडकीस आली. या प्रकरणी हॉटेल चालक कृष्णा कैलास गावंडे वय 40 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *