February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.25) – पती कामावर तर सासू-सासरे व मुलगा बाहेरगावी गेल्याने घरी एकटीच असलेली टेंभापुरी येथील 22 वर्षीय विवाहिता कोणास काही न सांगता ती बेपत्ता झाली. कामावर गेलेला पती जेवण करण्यासाठी दुपारी घरी आला असता ही घटना उघडकिस आला.

 

रेशमा सतीश गिरी वय 22 रा.टेंभापुरी ता.गंगापूर असे बेपत्ता झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या महिलेचा पती सतीश गिरी हा गुरुवारी (ता.19) जानेवारी रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास कामावर गेला होता. तर 10 वाजेच्या सुमारास त्याचे आई-वडील व मुलगा संगमनेर येथे बाहेरगावी गेले होते. त्यामुळे सतीश गिरी याची पत्नी रेशमा ही एकटीच घरी होती. ती कोणास काही एक न सांगता घरातून निघून गेली. दुपारी 1 वाजेच्या सुमारास सतीश गिरी हा जेवण करण्यासाठी घरी आला असता त्याची पत्नी रेशमा ही बेपत्ता असल्याचे उघडकीस आले. त्याने परिसरात व नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली रेशमा गिरी या महिलेचा शोध पोलीस हेडकॉन्स्टेबल सुखदेव भागडे घेत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *