वाळूजमहानगर, (ता.31) – शिवसेनेतून फुटून नव्यानेच उदयास आलेल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. या सर्वांचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी स्वागत केले.

रांजणगाव (शेंणपुजी) येथील एका खाजगी कार्यक्रमास पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी रांजणगाव शहरप्रमुख बाबासाहेब बटुळे यांच्या नेतृत्वाखाली विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेना मध्ये प्रवेश केला. या प्रसंगी ग्रामीण जिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख अरुण रोडगे, तालुकाप्रमुख दिलीप निरफळ, उपतालुकाप्रमुख नंदु राऊत, कामगार सेनेचे तालुका प्रमुख हरिदास चव्हाण, दिलीपसिंग राजपूत, भाऊसाहेब चव्हाण, संदिप मनोरे, जालिंदर सोनवणे, रांजणगाव शहरप्रमुख बाबासाहेब बटुळे, अक्षय ढोले, प्रभाकर महालकर, अनिश शेख, मुनिर सय्यद, गुळपिले पादील, बाळु मिसाळ, संजय निमोणे, सुरेश आघाव, प्रकाश काकडे, राज ठाकुर, उमेश भालेराव, अनिल गायके, संजय मंजुळे, लक्ष्मण वैष्णव, अजून चौधरी,
बाळु शिवणेकर, अप्पासाहेब भागवत, कृष्णा काकडे, गजानन पवार, नवनाथ जाधव, शरद शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
