March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.4) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील बसवंतराव पाटील प्राथमिक व माध्यमिक इंग्लिश स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा सोमवारी (ता.3) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आय. जी. जाधव यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात “गुरु विना शिष्य नाही” असे संबोधुन आपल्या भाषणाला सुरुवात केली. 

आपले पहिले गुरु हे आपले आई वडील असतात. आणि नंतर शिक्षक हे आपले गुरु असतात. गुरु आणि शिष्याचं काय नातं आहे हे त्यांनी महाभारतातील एकलव्याचे उदाहरण देऊन सांगितले. विद्यार्थ्यांनी सुद्धा गुरु विषयी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटवस्तू म्हणून स्वतःच्या हाताने बनवलेले भेट कार्ड दिले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव, मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, संस्थेचे सचिव हरीश जाधव, माध्यमिकचे मुख्याध्यापक बी व्ही शिरसाट, प्राथमिकच्या रेखा बिदरकर, संभाजी जाधव, हनुमान जाधव, निलेश मिसाळ, प्रीती नरवडे, दीप्ती झाडे, सोनी शुक्ला, लता वैष्णव, पूजा खोतकर, पूजा ठाकूर, ममता खोतकर, हर्षदा भुम्बे, हनुमान जाधव, दिपाली खैरे, विजया पवार त्यांची उपस्थिती होती. रेखा बिदरकर यांनी
नियोजन केलेल्या या कार्यक्रमाचे आभार संभाजी जाधव यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *