
वाळूजमहानगर- बनावट इन्स्ट्रा आयडी वापरून वाळूज परिसरात राहणाऱ्या एका महिलेचे फोटो व्हायरल करून तिची बदनामी करणाऱ्या एका भामट्याला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अजिंठा येथून बुधवारी 26 नोव्हेंबर रोजी जेरबंद केले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, फोटो बनावट इंस्टाग्राम आयडीवर फोटो अपलोड करून त्याखाली महिलेची बदनाम कारक मजकुर लिहून वारंवार इंस्टाग्रामवर स्टोरी लिहणाऱ्या विरुध्द
वाळूज परिसरातील एका महिलेने 19 नोव्हेंबर रोजी फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलिसांनी बनावट इंस्टाग्राम आडी बनवून फिर्यादी महिलेची बदनामी करणाऱ्याबाबत पोलीस ठाणे सायबर यांच्याकडून माहिती घेतली असता आरोपी ज्ञानेश्वर बाबुराव गावंडे (वय 38) रा. पिंपळदरी ता.सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर हा त्याच्या बंद असलेल्या मोबाईलवरून सोशलमिडायाचा वापर करून फिर्यादी महिलेची बदनामी करत होता. विशेष म्हणजे तो वेळोवेळी त्याचे लोकेशन बदलून अजिंठा परिसरात फिरत असल्याचे समजताच त्याचा शोध घेवून बुधवारी 26 नोव्हेंबर रोजी जेरबंद केले.
ही कामगिरी पोलीस उप आयुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त भागिरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोह. बाळासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे, पोअं. सुरेश भिसे, नितीन इनामे यांनी केली.
