वाळूजमहानगर, (ता.3) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील बजाज ऑटो एम्प्लॉईज युनियनच्या वतीने कंपनी समोरील संघटनेच्या नाम फलकास तसेच कामगार चौकातील कामगार पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध घोषणा देऊन कामगार दिनाचा जयजयकार करण्यात आला.
कार्यक्रमास युनियनचे अध्यक्ष विजय पवार, सचिव सत्यविजय देशमुख, उपाध्यक्ष मनोहर लघाणे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर भोरगीर, सहसचिव उद्धव कावळे, जिवन निकम, सहकोषाध्यक्ष प्रभु चव्हाण तसेच शॉप प्रतिनिधी केशव पंडित, गणेश प्रधान, उद्धव कावळे, राजाराम कोळशे, मारुती आवलगावे, योगेश बोरोले आदिल्स कामगारांची उपस्थिती होती.
