
वाळूजमहानगर, (ता.1)- विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत जरी अपयश आले असले, तरी पक्षाला एक लाखाच्यावर मतदान झाले. याचा अर्थ मतदारांचा शिवसेनेवरील विश्वास आढळ आहे. कमी फक्त आपल्यात आहे, आपण जनतेपर्यंत पोहोचलो पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक नागरिकांपर्यंत जा, वार्डातील समस्या जाणून घ्या. सत्ताधार्यांना जाब विचारण्यासाठी आंदोलने करा. असा मार्गदर्शनपर अवाहन विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी बजाजनगर येथे केले.
विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बजाजनगर येथे शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिकांची शनिवारी (ता.29) रोजी बैठक झाली. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतच्या निवडणुका डोळ्या समोर ठेऊन पक्षाने कम्बर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर बजाजनगर येथील सिद्धिविनायक गणपती मंदिर, त्रिमूर्ती चौक, येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संघटन वाढीसाठी पक्ष विशेष लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केले. तसेच पक्ष संघटना बळकटीकरण, नागरिक व पदाधिकारी यांच्याकडून वाळूज महानगरातील विविध समस्या जाणून घेतल्या. या समस्या सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्यासाठी विविध प्रकारचे आंदोलने करण्याच्या सूचना केल्या. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर, विधानसभाप्रमुख राजू शिंदे, तालुका संघटक बाळासाहेब कार्ले, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया, वसंत प्रधान, लक्ष्मण लांडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीचे सूत्रसंचालन प्रभारी शहरप्रमुख विशाल खंडागळे यांनी केले. यावेळी पाटोदाचे उपसरपंच कपिंद्र पेरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य महेंद्र खोतकर, माजी पंचायत समिती सदस्य गणेश नवले, सतीश पाटील, माजी उपसरपंच विष्णू जाधव, उपतालुकाप्रमुख श्रीकृष्ण राठोड, बळीराम पोले, सुभाष साबळे, सुदाम भंडे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी चौधरी, उपशहर प्रमुख बिबन सय्यद, नामदेव सागडे, बजरंग पाटील, काकाजी जीवरग, महिला तालुका संघटक अनिता पाटील, शहर संघटिका संगीता बनकर, शिक्षकसेना जिल्हा अध्यक्ष दत्ता पवार, शिक्षकसेना तालुका अध्यक्ष अनिरुद्ध कळकुंभे, युवासेना उपजिल्हाप्रमुख बिरजू तरय्यावाले, दलित आघाडी तालुका उपसंघटक अनिल जाधव, विभागप्रमुख रतन नलावडे, संजय मुराडे, नंदकुमार साळुंके, विनोद सोनवणे, संतोष चंदन , रोहिदास चव्हाण, सतीश हिवाळे, त्रिम्बक जगताप, लहू खराटे, विनोद दाभाडे, रामू सुरासे, विनोद सोनवणे, अशोक कटारे , दादासाहेब गोराडे, सुनील गोरे, गजानन राघूडे, महेंद्र जाधव, 
मा.जिल्हा परिषद सदस्य ज्योती चोरडिया, महिला आघाडीच्या मीरा चव्हाण, जोत्स्ना सोनवणे, लता रमंडवल, शीला सोनार, वैष्णवी गायकवाड, संजना अक्कावार, राजु चव्हाण, यशवंत चौधरी, अतुल दाभाडे, राकेश सक्सेना, धोंडिबा वरवते, गणेश कोल्हे, गणेश गावंदे, रावसाहेब अंभोरे, बाळासाहेब सुल्ताने, परमेश्वर गिरे, आत्माराम सातपुते, गोरख हिरे, जगन्नाथ भापकर, साहेबराव शिरवत, गोकुळ साळुंके, युवासेनेचे आकाश पवार, अक्षय खरात, विजय वाडेकर, शेख इस्माईल यांच्यासह शिवसैनिक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
