March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.24) – शिवनेरी प्रतिष्ठाण गणेशोत्सव समिती 2023 चिंचबन कॉलनी, बजाजनगरच्या वतीने व घाटी रक्तपेढीच्या माध्यमातून बजाजनगर येथे शनिवारी (ता.23) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रतिष्ठाण मधील सभासदांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

गणेशोत्सवात अनेक धार्मिक कार्यक्रमासह विविध सामाजिक उपक्रमही राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून चिंचबन कॉलनीतील शिवनेरी प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (ता.23) रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजे दरम्यान घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात प्रतिष्ठानच्या सभासदांसह 42 गणेश भक्तांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या रक्तदान शिबिरात शासकीय रक्तपेढीच्या अनुसया घोगरे यांच्यासह डॉक्टरांनी रक्त संकलन केले.   

रक्तदात्यांना प्रमाणपत्र
सर्व रक्तदात्यांना घाटीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी शिवनेरी प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे, गणेशोत्सव 2023 समितीचे अध्यक्ष प्रवीण सरडे, उपाध्यक्ष आशिष गवळी, वैभव नांगरे सचिव कृष्णा पाटील, वैभव माने, सहसचिव राहुल बोबडे, रोहित हुगेवार, कार्याध्यक्ष निलेश ढाकणे, सूरज घुमारे, विजय शेळके, प्रीतम सुरवसे, ऋषी गायकवाड, संदीप यादव, कोषाध्यक्ष सुमित रावते, सतपाल महेर, सहकोषाध्यक्ष दिनेश अव्हाळे, समाधान गोराडे, प्रसिद्धी प्रमुख विलास गोराडे, भूषण अग्रवाल, रंजन खाजोने, समीर सावंत यांच्यासह गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

स्तुत्य उपक्रम

शिवनेरी प्रतिष्ठाण, चिंचबन कॉलनी, बजाजनगरच्या सभासदांनी परिसरातील गरजूंना भासणारी रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी हा एक स्तुत्य उपक्रम राबवला. हा उपक्रम यापुढेही कायम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *