March 23, 2026

बजाजनगर येथे विवाहितेचा छळ, पाच जणांविरुद्ध गुन्हावाळूजमहानगर, (ता.2) – हुंडा कमी दिला, दिसायलाही चांगली नाही. असे वारंवार बोलून प्लॉट घेण्यासाठी माहेरहून पैसे आण. असे म्हणून 28 वर्षीय विवाहितेचा पती, सासू, सासरे, दीर व ननंद यांनी मानसिक व शारीरिक छळ केला. हा प्रकार 21 जून 2023 ते 7 फेब्रुवारी 2024 दरम्यान बजाज नगर येथे घडला.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बजाजनगर येथील द्वारकानगरीत राहणारी (मूळ रा. शाहूनगर, धाराशिव) वर्षा सुदर्शन लांडगे (वय 28) या विवाहितेचा पती, सासू, सासरा, दीर व ननंद यांनी संगणमत करून तु दिसायला चांगली नाही, तुझा जॉब बघुन तुझ्यासोबत लग्न केले. जास्त हुंडा मिळाला नाही, तुझ्या आईवडीलांनीही कमी हुंडा दिला, प्लॉट घेण्यासाठी तुझ्या आईवडीलांकडुन पैसे घेवुन ये. असे बोलून 21 जून 2023 ते 7 फेब्रुवारी 2024 पर्यंत अपमानास्पद वागणुक दिली. वारंवार पैशाची मागणी करुन शारीरीक व मानसिक छळ केला. तसेच नेहमी शिवीगाळ करुन हाताचापटाने मारहाण करीत होते. याप्रकरणी वर्षा सुदर्शन लांडगे या विवाहितेच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी पती सुदर्शन गोवर्धन लांडगे, सासु विध्या गोवर्धन लांडगे, सासरा गोवर्धन निळकंठ लांडगे, दिर सुमेध गोवर्धन लांडगे व नणंद सुहागिनी आप्पासाहेब गरगडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश तारव करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *