
वाळुज महानगर, (ता.23)- आजारी आईला उपचारार्थ दाखल करण्यात आल्याने वडिलांसोबत हॉस्पिटलमध्ये आलेल्या एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवून कोणत्यातरी कारणासाठी पळवून नेले. ही घटना सोमवारी (ता.21) रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास बजाजनगर येथे घडली.

याबाबत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीचा आशय असा की, पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीची आई आजारी असल्याने तिला बजाजनगर येथील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. त्यामुळे अल्पवयीन मुलगी वडिलांसोबत हॉस्पिटलमध्ये आली होती. तिला काहीतरी आमिष दाखवून कोणत्यातरी कारणासाठी तीन जणांनी दुचाकीवर बसवून पळवून नेले. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ऋषिकेश मच्छिंद्र त्रिभुवन (वय अंदाजे 21 वर्षे) रा. पालखेड ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर, कृष्णा ज्ञानेश्वर त्रिभुवन (वय अंदाजे 18 वर्षे) व रोहीत राजु त्रिभुवन (वय अंदाजे 18 वर्षे) रा. पालखेड ता. तालुका वैजापुर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या विरुद्ध वाळुज एमाडिसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान तीन आरोपी पैकी रोहीत राजु त्रिभुवन व
कृष्णा ज्ञानेश्वर त्रिभुवन यांनी (दुचाकी एमएच 20, एच सी -0960) या एका दुचाकीवर चौघांनी जाऊन मुख्य आरोपी ऋषिकेश त्रिभुवन व पीडित मुलीला अहिल्यानगर बस स्थानकावर सोडून परत आले. मात्र ऋषिकेश त्रिभुवन हा पीडित अल्पवयीन मुलीला घेऊन फरारच आहे.
