March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.7) – नेहमी होणारी वाहतूक कोंडी व सततच्या लहान-मोठ्या अपघातामुळे जवळजवळ साडेतीनशे अतिक्रमण धारकांसह लाखो नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याने तसेच या सर्व प्रकारामुळे पोलिसांची डोकेदुखी बनलेल्या बजाजनगर येथील त्यावरील अतिक्रमण हटवल्याने रस्त्याने तर मोकळा श्वास घेतला. शिवाय अतिक्रमण धारकांसह रस्त्याने ये जा करणाऱ्या लाखो नागरीकांनीही रोजच्या त्रासातून मुक्ती मिळाल्याने त्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

औद्योगिक वसाहतीसह, वाळूज महामार्ग तसेच बजाजनगर येथील प्रमुख व मुख्य चौक येथील चौकात चौकात व फूटपाथवर भाजीपाला विक्रेत्यांसह वस्तू विक्रेत्यांनी अतिक्रमण करून ठाण मांडले होते. विक्रेत्यांचे हे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले होते. त्यामुळे मोहोटादेवी मंदिर परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत होती. रात्री उशिरापर्यंत येते विक्रेते असतात. सायंकाळ नंतर लोक दारू पिऊन वाहने चालवतात.

एखादा वाहनधारक अपघात करून विक्रेत्याच्या अंगावर गेला. आणि त्यात त्याचा जीव केल्यास मोबब्लिचिंग सारखी घटना घडू शकते. तसेच लहान मोठे अपघाताच्या घटनांमध्ये सतत वाढ होत होती. या घटनांबाबत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारी आल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती.

या डोकेदुखीवर रामबाण उपाय म्हणून वाळुज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश आघाव यांनी अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली. त्यानुसार रविवारी (ता.7) रोजी वाळुज एमआयडीसी पोलिसांनी केली. या अतिक्रमण हटाव मोहित रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या जवळजवळ साडेतीनशे अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यातआली. अतिक्रमणात भाजीपाला विक्रेत्यांपासून विविध वस्तू विक्रेत्यांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने फुटपाथवर बसलेले भाजी विक्रेते, टपऱ्या, हात गाड्या, फेरीवाले तसेच लहान दुकाने यांचा समावेश आहे.

ही अतिक्रमण हटाव मोहीम वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोलीस अंमलदार महेंद्र साळुंखे, हेड कॉन्स्टेबल योगेश कासर्ले, पोलीस कॉन्स्टेबल समाधान पाटील, वैभव गायकवाड, महिला हेड कॉन्स्टेबल रेखा चांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राबवण्यात आली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *