March 23, 2026

वाळुज महानगर, (ता. 5) – आयसीएसई बोर्डाच्या वतीने फेब्रुवारी- मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत बजाजनगर येथील युरेका इन्फोसिस स्कूलचा 100 टक्के निकाल लागला. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून निकालाच्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.


बोर्ड परीक्षेतील संस्थेच्या उत्कृष्ट कामगिरीचे पालक वर्गाकडून कौतुक करण्यात आले. या परिक्षेत सार्थक यादव 95.4 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. द्वितीय क्रमांक कृष्णप्रिया जाधव हिने-95 टक्के गुण मिळवत घेतला. तर तृतीय क्रमांक अक्षता फसाटे हिने 93.2 टक्के गुण मिळवून घेतला. तसेच संस्कृती देशपांडेने 93 टक्के गुण प्राप्त करून चौथा क्रमांक मिळविला. आर्यन अल्हाट 90.8 टक्के व निर्भय सिंगलकर 90 टक्के असे या विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त केले. विशेष म्हणजे 23 विद्यार्थ्यांनी 80 टक्क्या पेक्षा जास्त गुण प्राप्त केले. यातूनच शाळेने व शिक्षकांनी घेतलेले परिश्रम दिसून येतात. काही विद्यार्थ्यांनी इतिहास, होम सायन्स या विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक सुनील पाडळकर, गौतम चोपडा, सचिन घुगे, गौरव लोढा, शीतल लोढा तसेच शाळेच्या प्राचार्य प्रज्ञा कोराने यांच्यासह शिक्षक व पालक वर्ग यांच्याकडून कौतुक करण्यात येत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *