
वाळूज महानगर, (ता.7) – भाड्याच्या खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वाळुज एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून झन्नामन्ना नावाचा जुगार खेळताना व खेळविताना 8 जुगार्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 6 लाख 9 हजार 420 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई बजाजनगर येथील सौ. मीनाताई ठाकरे मार्केटमध्ये करण्यात आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, साई पार्क 2 कमळापुर येथील सिध्दार्थ गजाराम वाघमारे व पवननगर रांजनगाव (शे.पु) येथील भाऊसाहेब रामराव वेताळ यांनी संगनमताने झन्ना मन्ना जुगार खेऴण्याकरीता बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात भाड्याने खोली घेतली. व पत्ते खेळणाऱ्या जुगार्यांना एकत्रित करुन पत्त्याचा क्लब सुरू केला. ही माहिती मिळाली असता पोलिसांनी तेथे छापा टाकला. त्यावेळी तेथे आरोपी सिध्दार्थ गजाराम वाघमारे (32) रा.साई पार्क 2 कमळापुर, भाऊसाहेब रामराव वेताळ (45) रा. पवननगर रांजनगाव (शे.पु), बाळु नागनाथ निळकंठ (52) रा.मंगलमुर्ती कॉलनी रांजनगाव (शे.पु.), सुमंत रवी खरात (33) रा.एन.13 छत्रपती संभाजीनगर, विकास मानिक राऊत (32) रा. वाळुज, शेख जावेद शेख रज्जाक (35), रा. दत्तनगर रांजनगाव (शे.पु.), शेख अजीज शेख उस्मान (49) रा. पवननगर रांजनगाव (शे.पु.), किशोर रतन तुरे (35) रा. जय भवानी चौक, बजाजनगर असे आठ जण पत्त्यावर पैसे लावून झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. या सर्वांना ताब्यात घेऊन पोलिसांनी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम, दुचाकी वाहन, टेबल खुर्ची व संगणक संचासह 6 लाख 9 हजार 420 रुपये किंमतीचा मुदेमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस अंमलदार सुरजकुमार अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आठ जुगार्यांविरूध्द कलम 4, 5 महाराष्ट्र जूगार कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपी भाउसाहेब रामराव वेताळ हा खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याच्याविरुध्द खून, अवैध धंदे,जुगाराचे गुन्हे दाखल आहेत. 
ही कार्यवाही सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, दुय्यम पोलीस निरीक्षक गणेश ताठे, पोउपनि.संदीप शिंदे, तसेच सुरज अग्रवाल, हनुमंत ठोके, धिरज काबलिये, अविनाश ढगे, यशवंत गोबाडे, दिपक मतलबे, राजाभाऊ कोल्हे, नितीन इनामे, शेखर सोहळे, दिपक मतलबे, यांनी केली.
