March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.28) – वक्ता असल्याने भाषण करण्यासाठी वेगवेगळ्या बाहेरगावी तसेच भावाच्या घरी गेलेल्या 26 वर्षीय तरुणीचे कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले 95 हजार रुपये कोणीतरी अज्ञात आरोपीने लंपास केले. ही चोरीची घटना गुरुवारी (ता.27) रोजी सकाळी बजाजनगर येथे उघडकीस आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, इंद्रप्रस्थ कॉलनी बजाज नगर येथील हर्षु किसनसिंग ठाकुर (वय 26) ही तरुणी वक्ता म्हणून काम करते. 17 मार्च रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास ती भाषण करण्यासाठी कोतुल जि. अहील्यानगर येथे नंतर तेथुन नांदेड येथे व तेथुन यवतमाळ येथे गेली. त्यानंतर भावाच्या मुलाचे नामकरणासाठी परत नांदेड येथे गेली. तेथे सात दिवस राहीली. 26 मार्च रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर येथे परत आली. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पैसे घेण्यासाठी कपाटाचे लॉकर उघडले असता त्यामध्ये ठेवलेले 95 हजार रुपये चोरी झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *