वाळूजमहानगर, ता.20 – बजाजनगरातील अल्फोन्सा शाळेजवळ गर्दी झाल्याने पोलीसांनी सांयकाळी 5.30 वाजेच्या सुमारास सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे मतदार संतप्त झाले. यावेळी झालेल्या तणावामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान राजू शिंदे यांनी मतदान केंद्रासमोर ठिय्या मांडला.
बजाजनगर येथे बुधवारी (ता.20) रोजी मतदान प्रक्रिया सुरू असताना अल्फोंसा शाळेसमोरील मतदान केंद्र बाहेर गर्दी झाली होती. त्याचवेळी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे हे फौज फाट्यासह तेथे आले. झालेली गर्दी पाहून पोलीस उपायुक्त व त्यांच्यासोबत च्या पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज केला. या लाठीचार्ज मध्ये महिला व पुरुष मतदार किरकोळ जखमी झाले. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा बजाजनगर परिसरात वाऱ्यासारखा व्हायरल झाला. दरम्यान हा लाठीचार्ज आमदार संजय शिरसाट यांच्या सांगण्यावरून केल्याचा आरोप उबाठा गटाचे उमेदवार राजू शिंदे यांनी करत मतदान केंद्राबाहेरच कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला. आमदार शिरसाट यांनी घडवून आणलेल्या या लाठीचार्ज प्रकरणी कारवाई करा अशी मागणी यावेळी राजू शिंदे यांनी केली. दरम्यान मतदान केंद्रासमोर जमलेली गर्दी पांगवण्यासाठी आम्ही त्यांना धमकावले. लाठीचार्ज आम्ही केलाच नाही. असे पोलीस उपायुक्त नितीन बगाटे हे बोलत असल्याचेसुद्धा व्हिडिओमध्ये दिसत आहे.