
वाळुज महानगर, (ता.27) – वाळूज महानगरातील रामलीला मैदान बजाजनगर येथे श्रीराम जानकी प्रतिष्ठानतर्फे आयोजित अभिनय स्वरूप, संगीतमय, रामलीला पाहण्यासाठी दर्शकांची गर्दी होत आहे.

नवरात्रि निम्मित 22 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या रामलीला कार्यक्रमाचा शुक्रवारी पाचवा दिवस होता. रामलीलाचा समारोप दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केल्या नंतर 2 ऑक्टोबर रोजी श्री राम राज्याभिषेकाने करण्यात येणार आहे. हा भव्य धार्मिक कार्यक्रम दररोज सायंकाळी 7 ते 10 पर्यंत 30 कलाकारांचा संच सादर करत आहे. मंगळवारी माजी सरपंच छायाताई कारले व बाळासाहेब कारले, बुधवारी माजी खासदार चंद्रकांत खैरे, गुरुवारी दैनिक लोकमत समाचारचे संपादक अमिताभ श्रीवास्तव यांच्या हस्ते व शुक्रवारी रांजणगाव येथील उद्योजक ईश्वर नारायण पंडित, कलावती देवी पंडित, ज्ञानचंद राय, राधा राय, दिलीप राय व शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख बाप्पा दळवी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. रामलीला यशस्वीतेसाठी श्रीराम जानकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर के सिंह, महासचिव उदय सिंह तोमर, उपाध्यक्ष ज्योती स्वरूप मित्तल, राघवेंद्र सिंह, जगत बहादुर सिंह, पंडित हरिश्चंद्र उपाध्याय, पुजारी राजेश्वरनंद पांडे महाराज, कैलास यादव, बच्चा सिंह, पुजारी अशोक पांडे, भाजपा उत्तर भारतीय मोर्चा सम्भाजीनगरचे अध्यक्ष नरेंद्र सिंह यादव, कैलाश यादव, राजेश सिंह, कान्हा सिंह, अमित सिंह यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
