
वाळुज महानगर, (ता.2)- परिसरातील दिव्यांग महिला पुरुषांनी मतदान जनजागृतीसाठी बजाजनगर मध्ये भव्य रॅली काढून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 30 एप्रिल रोजी जनजागृती केली. विशेष म्हणजे सर्व दिव्यांग 100 टक्के मतदान करून मतदानाचा हक्क बजावण्याचा संकल्प केला. दिव्यांगांनी ही रॅली काढून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.

दिव्यांगच्या सायकली दहा, दिव्यांगांच्या चारचाकी, स्कुटी व अनेक वाहन या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. ही रॅली जागृत हनुमान मंदिर बजाजनगर येथून निघून भाजी मंडई मार्गे त्रिमूर्ती चौक, हायटेक कॉलेज, महाराणा प्रताप चौक येथे विसर्जीत झाली. रॅलीसाठी खास उपस्थित समाज कल्याण अधिकारी वाघ उपस्थित होते. ते स्वतः रॅलीमध्ये सामील झाले. रॅलीच्या समारोपामध्ये दिव्यांगाच्या मतदानासाठी असलेल्या अडीअडचणी दिव्यांगाचा 12 डी नंबर फॉर्म भरून घेणे व दिव्यांगाला मतदानासाठी सर्व सुविधा देणे या विषयीची माहिती दत्ता वाकडे यांनी दिली. समाज कल्याण अधिकारी वाघ यांनी सर्व दिव्यांगांना मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत सशक्त माणूस करू शकत नाही असे मतदान जनजागृतीचं काम बजाजनगर मध्ये दिव्यांगांनी केले. ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. असे मनोगत व्यक्त करताना वाघ यांनी केलं. 
या रॅलीमध्ये पारसचंद साकला, दत्ता वाकडे, किशोर फेगडे, डॉ. संकपाळ, बद्रीनाथ लघाने, दत्तू लघाने, शिवाजी दांगट राजे, एकनाथ किर्तीकर, जोतीराम जाधव, गणेश आहेर, सुनिता हिवर्डे, शिवकन्या,आशा सारडा, संरोजा भोसले, सुभाष पाईकराव, दिलीप कदम, विनोद पाटील, माणिक कुंभार, संजय फलटणे, शिवाजी राऊत शेलगावकर, प्रदीप माळी, दशरथ मात्रे, शिवानी वाकडे, मीरा घुमरे, सास्ते महाराज, उज्वला फेगडे, सुनिता कदम, कोमल झिंजुर्डे, हर्षाली वाकडे, योगीराज तळेकर, सुनिता कदम यांच्यासह दिव्यांग बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
