
वाळूजमहानगर, (ता.21) -घरा समोर हॅन्ड लॉक करून उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना सोमवारी (ता.11) रोजी बजाजनगरात घडली. या दुचाकी चा शोध घेऊनसुद्धा ती मिळून न आल्याने अखेर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बजाजनगर येथील जय भवानीनगरात राहणारे प्रशांत इंगोले यांनी सोमवारी (ता.11) मार्च रोजी रात्री नेहमी प्रमाणे दुचाकी (एमएच 38, एफ -8765) ही हॅन्ड लॉक करून उभी केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती रात्रीतून लंपास केली. म्हणून तिचा आजूबाजूला इतत्र शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
