
वाळूज महानगर, (ता.18) – अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शैक्षिक महासंघाचे प्रकोष्ठ प्रमुख प्रा.डॉ. संदीप जगताप यांची नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी क्रीडा संचालक पदी निवड करण्यात आली.
डॉ. जगताप हे श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय मध्ये क्रीडा संचालक असून यांनी 7 वेळेस आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असून त्यांची क्रीडा क्षेत्रात 7 पुस्तके प्रकाशित आहेत. डॉ. जगताप यांनी साऊथ कोरिया, जपान, मलेशिया, मॉरिशियस, थाईलंड आदी देशात खेळाचा अभ्याससाठी गेले आहेत. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्याच्या या कामगिरीची दाखल घेत विद्यापीठाचे कुलगुरू यांनी यांना डॉ.बा अ.म विद्यापीठच्या प्र-क्रीडा संचालक म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यांनी तो पदभार स्वीकारला आहे. या नियुक्तीमुळे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शैक्षिक महासंघातर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ.दिलीप अर्जुने, महामंत्री प्रोफेसर डॉ.सत्यप्रेम घुमरे, महिला अध्यक्ष डॉ.महानंदा दळवी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष प्रोफेसर डॉ.संजय सांभाळकर, प्रसिद्धीप्रमुख डॉ.भरतसिंग सलामपुरे, डॉ.भगवान डोके कोषाध्यक्ष प्रोफेसर डॉ.प्रशांत नेतनकर, प्रोफेसर डॉ.खरात, डॉ.नितीन माळेगावकर आदींची उपस्थिती होती.
