March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.12) – बजाजनगर येथील स्व. भैरोमल तनवाणी ज्युनियर कॉलेज मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे त्वचारोग तज्ञ डॉक्टर मनीषा शेळके यांनी महिलांना आहाराविषयी व आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात कायदेविषयक तज्ञ शिल्पा सूर्यवंशी यांनी महिलांना त्यांचे हक्क, कर्तव्य, अधिकार व जबाबदारीची जाणीव करून दिली. महाविद्यालयाच्या प्राचार्य अर्चना जाधव यांनी महिला सक्षमीकरण यावर मार्गदर्शन केले. महिलांचा आत्मविश्वास दृढ व्हावा याकरिता महिलांनी रॅम्प वॉक, संगीत खुर्ची, फॅशन शो, खेळ पैठणीचा असे विविध स्पर्धा व मनोरंजनात्मक खेळात सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला. विद्यार्थिनींनी देखील विविध नृत्य व गायन सादर केले व आपल्या आई विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता माता पालकांचे पूजन केले.

याप्रसंगी संस्थेच्या पदाधिकारी सुनीता माने व सविता नवले यांनी देखील महिलांच्या खेळाचे निरीक्षण करून त्यांना विविध बक्षीसांचे वितरण केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षिका जोत्सना निलावाड, सीमा पगारे, निकम शुभांगी, जगताप अर्चना, माधुरी औटे, किशोरी हिवराळे, मयुरी बारवकर, राजपूत चंदन, पवार प्रकाश, के आय शेख, एस बी शेख, प्रदीप कुलकर्णी, स्वप्निल इंगळे आदींनी प्रयत्न केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *