
वाळूजमहानगर, (ता.26) – लोकसभा 2024 ची उमेदवारी वाळूज परिसरातील आदर्श पाटोदागावचे शिल्पकार भास्करराव पेरे पाटील यांना देण्यात यावी. अशी मागणी वजा विनंती एका निवेदनाद्वारे आदर्श पाटोदा गावाच्या वतीने मंगळवारी (ता.26) रोजी करण्यात आली आहे. 
याबाबत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना आदर्श पाटोदा गावकऱ्यांच्या वतीने दिलेल्या एका निवेदनात असे म्हटले आहे की, 2024 ची लोकसभेची उमेदवारीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श पाटोदा गावचे शिल्पकार, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना देण्यात यावी. त्यांच कार्य पाहता त्यांच्या कार्यकाळात गावाला मिळालेले दोन वेळेस राष्ट्रपती पुरस्कार गावाला देशभर प्रशिध्दी मिळवून देऊन, पाटोदागाव राज्याच्या आभ्यासक्रमापर्यंत
अणुन ठेवले. गाव स्मार्ट व्हीलेज कसे असावे याच उत्तम उदारण म्हणजे आदर्श गाव पाटोदा. या गावाला मिळणाऱ्या मोफत सुविधा, मोफत पिठाची गिरणी, गावाला चार प्रकारचे पाणी, पिण्या करीता आर.ओ. चे शुध्द पाणी, अंघोळीला गरम पाणी, घाण, कचरा व्यवस्थापन याचे उत्तम उदाहरण येथे पहावयास मिळते. विशेष म्हणजे 25 वर्षे गावाची निस्वार्थ सेवा करत भास्करराव पेरे पाटील यांनी आज देशभर गाव खेडे पिंजून काढत समाज प्रबोधन केले. आजही ते दिवस रात्र फिरून समाजाला विकासाचे धडे देण्याचे कार्य करत आहे.
भास्करराव पेरे पाटील यांच्या निस्वार्थ भूमिकेमुळे
छत्रपती संभाजीनगरातून 2024 ची लोकसभा उमेदवारी आपण भास्करराव पेरे पाटील यांना देण्यात यावी. असे विनंती वजा निवेदन समस्त छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आदर्श पाटोदा गावकऱ्यांनी दिले आहे.
