
वाळुज महानगर, (ता.27)- वाळुज परिसरातील राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळवणाऱ्या पाटोदा ता.जि.छत्रपती संभाजीनगर येथे राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमात खास महिलांसाठी ओपन जिम या आणखी एका उपक्रमाची भर पडली.
वाळूज परिसरातील पाटोदा या गावात ग्रामपंचायतच्या वतीने शासकीय योजनेचा लाभ घेऊन अनेक उपक्रम राबवले. त्यामुळे गावाला राष्ट्रपती पदकासह विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतरही ग्रामपंचायतच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आदर्शगाव पाटोदा येथे खास महिलांसाठी ओपन जिम तयार करण्यात आली. त्याचे 24 जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सरपंच जयश्री दिवेकर, उपसरपंच कपिंद्र पेरे, ग्राम विकास अधिकारी पी एस पाटील, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण मातकर, पुष्पाबाई पेरे, बेबीबाई पेरे, पूनम गाडेकर, छाया पवार, शामल थटवले, मंदा खोकड, मीरा जाधव, सुनिता पेरे यांच्यासह निलेश पेरे, दुर्गेश खोकड, शिवाजी जाधव, साईनाथ ढाकणे, दत्तू घुगे, कडूबाळ राऊत, भाऊसाहेब मातकर, परसराम शेळके व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
