March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.27) – तु माझ्याकडे खुन्नसने काय बघतोस असे म्हणत तीन जणांनी हाताचापटाने व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याने वीस वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी झाला ही घटना 25 मार्च रोजी रात्री पंढरपूर येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजू सलाउद्दीन शेख वय 20 हा विद्यार्थी 25 मार्च रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास पंढरपूर येथे उभा असताना भाऊराव लोंढे, विनोद उंदे, विशाल उंदे असे तेथुन जात होते. यावेळी त्यांनी तू आमच्याकडे खुन्नसने काय बघतोस असे विचारत त्यांनी राजू शेख याला शिवीगाळ करुन हाताचापटाने व लोखंडी रॉड डोक्यात, हातावर, पाठीवर मारल्याने रक्तस्त्राव झाला. यावेळी राजू याने आरडा ओरड केल्याने तु पोलीसात तक्रार दिली तर तुला जीवे मारेल. अशी धमकी देवुन आरोपी तेथुन निघुन गेले. याप्रकरणी राजू शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश कासार्ले करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *