वाळूजमहानगर, (ता.17 – शासनाने प्रतिबंधित केलेला तसेच वाहनधारक, लहान मुले, पशु, पक्षी यांच्यासाठी धोकादायक असलेला नायलॉन मांजा विक्री करताना मिळून आल्याने पंढरपूर येथी एका व्यापाऱ्याविरोधात शुक्रवारी (ता.16) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नायलॉन मांजामुळे पतंग कटल्यानंतर पतंगाचा मांजा रोडवर तसेच इतरत्र पडल्यास लहान मुले, वाहनधारक, पशु, पक्षी, पादचारी यांना अडकून दुखापत होण्याची भीती असते. हे माहीत असताना सुद्धा तसेच शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा आरोपी शामद हसन पठाण रा. इंदिरानगर, पंढरपूर या व्यापाऱ्याने तो जवळ बाळगून विक्री करताना मिळून आला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 1 हजार 400 रुपयाचा नायलॉन मांजा जप्त केला. याप्रकरणी पोलीस नाईक नवनाथ किसन खांडेकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी शामद पठाण यांच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
