March 23, 2026

पंढरपूर येथे एकादशी निमित्त विविध कार्यक्र
वाळूजमहानगर, (ता.10) – अमलकी एकादशी निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांच्या वतीने महाभिषेक, संतपुजन, हरी किर्तन व फराळ आदी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान एकादशी निमित्त सोमवारी (ता.10) रोजी परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

आमलकी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठल रुख्मिणी मंदिरात सोमवारी (ता.10) रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत ह.भ.प. चांगदेव महाराज काकडे कंडारीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ह.भ.प. चांगदेव महाराज काकडे कंडारीकर यांनी उपदेशपर किर्तन करत आजच्या युगात मध्ये माणसाला यशस्वी व्हायचे असेल तर जिवनात सदाचार आश्वयक असून, तो सदाचार परमेश्वराच्या नामस्मरणात, भक्तीरसात मिळतो. या अनुभुती मिळविण्यासाठी माणसाने जिवनातील अधिकाधिक काळ नामस्मारणात घालवला पाहिजे. असे प्रतिपादन केले.

वाळूज परिसरात प्रती पंढरपूर म्हणून नावलौकिक असलेल्या विठ्ठल रुख्मिणी मंदिरात आमलकी एकादशी निमित्ताने कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 5:30 महाभिषेक, संतपुजन व फराळ महाप्रसादची आयोजन संतोष महाराज कांबळे व दिपक महाराज कांबळे यांच्याकडून करण्यात आले. यावेळी मृदुंगाचार्य ह.भ.प. भागवत महाराज गोराडे, दिपक महाराज कांबळे, गायणाचार्य ह.भ.प. संतोष महाराज कांबळे, अप्पासाहेब महाराज आदमाने, जगन्नाथ महाराज थोरात, एखंडे महाराज, देशमाने बाबा, भगवान आव्हाळे, आदि भजनी मंडळीनी सहकार्य केले. यावेळी मंदिर संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव अप्पासाहेब झळके आदि पदाधिकारी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *