
वाळूजमहानगर, (ता.1) -मी मंत्रालयात नोकरीला आहे. अशी थाप मारून नोकरी लावून देतो. तसेच शायकीय योजनांतून मदत मिळवून देण्याचे आम्ही दाखवून चौघांकडून पैसे घेऊन 1 लाख 81 हजार रुपयांची फसवणुक केली. हा प्रकार 23 ऑगस्ट 2023 दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तारखेला घडला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तिसगाव येथील आरोपी पंकज अंबादास म्हस्के, अंबादास राणु म्हस्के व पंकजची आई यांनी आमचा मुलगा मंत्रालयात मोठ्या पदावर नोकरी करत आहे. तो सर्व शासकीय कामे करून देतो. मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी त्याची ओळख असल्याचा दावा करत लोकांना विश्वासात घेऊन अनेकांना फसविल्याचे समोर आले. 23 ऑगस्ट 2023 मध्ये त्याने शेत नावावर करून देण्यासाठी कुसुम अशोक लाड यांच्याकडून 25 हजार रुपए घेतले. बबीता उमेश सिंग यांच्याकडून त्यांच्या मुलाचा एमबीबीएस प्रवेशासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्याचे सांगून त्याच्याकडून 47 हजाराची रक्कम उकळली. विशेष म्हणजे निधी मिळण्याच्या नावाखाली वारंवार वेळ आणि अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. महावितरणमध्ये नोकरी लावून देण्याचा बनाव करून दोन तरुणांना महावितरणमध्ये शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. यासाठी त्यांच्याकडून प्रत्येकी 60 व 49 हजार रुपए घेतले. मात्र नोकरी लावून दिली नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्यांनी जाब विचारला. तेव्हा तो उडवाउडवीचे उत्तरे देत होता. शेवटी फसगत झाल्याचे लक्षात येताच कुसुम अशोक लगड वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी आरोपी पंकज अंबादास म्हस्के, अंबादास राणु म्हस्के व पंकजची आई त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि संदिप काळे करीत आहे.
