February 5, 2026

वाळुज महानगर (ता 1)- नांदायला येत नाही असे म्हणाल्याच्या कारणावरुन 32 वर्षीय महिलेला व तिच्या आईवडीलांना शिवीगाळ करुन हाताचापटांनी व लाकडी बँटने वडीलांच्या हाताला फँक्चर केले. ही घटना रविवारी 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास रांजणगाव (शेणपुंजी) येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रुपाली मच्छिंद्र उदमले (वय 32 वर्ष) ही मच्छिंद्र भिकाजी उदमले, आई सुमन मच्छिंद्र उदमले व मुलगा प्रज्वल लहु सोनवणे यांच्यासह पवननगर राजणगांव (शे.पु) येथे राहत असुन खाजगी नोकरी करते. रविवारी 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेचे सुमारास ती घरी असतांना रुपालीचा पती ज्ञानेश्वर धनाजी बोरुडे, जाऊ सुजाता तुकाराम बोरुडे, दीर तुकाराम धनाजी बोरुडे सर्व रा. अशोकनगर श्रीरामपुर ता. जि. अहील्यानगर हे रांजणगाव येथे आले. व सुजाता तुकाराम बोरुडे ही रूपालीला म्हणाली की, तुला नांदायला यायचे की, नाही. त्यावर रूपालीने नाही यायचे. असे म्हणाली असता ज्ञानेश्वर धनाजी बोरुडे, सुजाता तुकाराम बोरुडे, तुकाराम धनाजी बोरुडे या सर्वांनी संगनमत करुन रूपालीला शिविगाळ करुन हाताचापटांनी मारहाण केली. त्यामुळे तिचे आई, वडील सोडविण्यासाठी आले असता त्यांना सुद्धा शिवीगाळ करुन हाताचापटांनी व लाकडी बँटने वडीलांच्या उजव्या हाताला मारल्याने अंगठ्याजवळ फँक्चर झाले आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *