
वाळूजमहानगर, (ता.26) – भरधाव जाणार्या स्कार्पिओने दुचाकी व नवस फेडून येणाऱ्यांच्या पिकअप लोडींग टेम्पोला जोराची धडक दिली. तीन वाहनांच्या झालेल्या या विचित्र अपघातात दुचाकी वरील दोन व टेम्पो मधील चार. असे सहा जण जखमी झाले. अपघातानंतर स्कार्पिओ चालक घटनास्थळावरून फरार झाला. हा अपघात रविवारी (ता.25) रोजी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास औरंगाबाद नगर रोडवरील जिकठाण फाट्यावर झाला.
या अपघाताबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, स्कार्पिओ (एम एच 12, एम बी -2007) च्या अज्ञात
चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी निष्काळजी पणाने व भरधाव चालवुन त्याच्या समोर जाणाऱ्या दुचाकीला धडक धडक दिली. तसेच गंगापूरकडून औरंगाबादकडे येणाऱ्या भास्कर नारायण चव्हाण (वय 39) रा. नागेश्वरवाडी, औरंगाबाद यांच्या अशोक लेलंड कंपनीच्या पिकअप लोडींग टेम्पो (एम एच 20, ई जी -1551) ला सुध्दा जोरात धडक दिली. औरंगाबाद नगर रोडवरील जिकठाण फाट्यावर हा अपघात रविवारी (ता.25) रोजी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास झाला. या विचित्र अपघातात दुचाकीवरील उत्तम रामभाऊ इंगळे (60),आणि वैजनाथ शिवाजी गाविलकर (40) रा.लिंबेजळगाव मळ्यात हे सासरे- जावई तसेच टेम्पो मधील भास्कर नारायण चव्हाण (वय 39) रा. नागेश्वरवाडी, औरंगाबाद, अशोक पांडुरंग शेळके रा. अब्दीमंडी दौलताबाद, पाडुरंग भाऊलाल लहरे रा. नागेश्वरवाडी व कुमोतबाई कल्याणसिंग ठाकुर रा. अब्दीमंडी दौलताबाद असे असे सहा जण जखमी झाले. मात्र सुदैवाने टेम्पो मधील तीन महिला बालंबाल बचावल्या.

अपघातानंतर जखमींना उपचारार्थ दाखल न करता किंवा अपघाताची माहिती न देता स्कार्पिओ चालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नानिजधाम रुग्णवाहिकेचे पायलट संदीप त्रिंबके यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत जखमींना उपचारार्थ दाखल केले. या प्रकरणी टेम्पो चालक भास्कर नारायण चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज पोलीस ठाण्यात स्कार्पिओच्या अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दशरथ खोसरे करीत आहे.
नवस फेडून येताना झाला अपघात –
गंगापुर येथे भास्कर चव्हाण यांच्या ओळखिचे पाडुरंग लहरे यांचा हजरद ख्याजाउद्दीन दर्गा गंगापुर येथे नवस असल्याने त्याचे जेवणाचे सामान घेऊन गेले होते. कार्यक्रम आटपुन कार्यक्रमाची भांडी व इतर सामान घेऊन भास्कर चव्हाण, अशोक शेळके, पाडुरंग लहरे, कुमोतबाई ठाकुर व अन्य महिला असे गंगापुर येथुन टेम्पो (एम एच 20-ईजी -1551)मध्ये बसवुन औरंगाबादकडे येत होते.
