March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.29) – घरकाम आटोपून कंपनीत काम कर, प्लॉट घेण्यासाठी माहेरहुन 50 हजार रुपये आण. असे म्हणत वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या 24 वर्षीय नवविवाहितेचा सासरच्या मंडळींनी छळ केल्याने तिने राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (ता.27) रोजी सायंकाळी झालेल्या या घटनेत प्रकरणी सासरकडील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रांजणगाव (शेणपुंजी) येथील 24 वर्षीय सुप्रिया हिचे 26 में 2024 रोजी ओमसाईनगर, रांजणागव (शेणपुंजी ) येथील सुमित मधुकर वाघमारे याच्या सोबत लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवस तीला सासरकडील मंडळीनी चांगले वागवले. मात्र मागील एक महिन्यापासुन सुप्रिया हिचा पती, सासु,bसासरा आणि दीर यांनी संगणमत करून तु घरी बसून आयतं खाऊ नको, पहाटे लवकर उठवून पुर्ण काम अटोपून कंपनीत काम कर व आलेला पगार आम्हला दे. तसेच तुझ्या लग्नात आम्हाला फक्त पाचच ग्रॅमचे सोनं दिले. आता प्लॉट घेण्यासाठी माहेराहून 50 हजार रुपये घेऊन ये, नाहीतर तुझे जागणे मुश्कील करू. असे म्हणत शारिरिक व मानसिक छळ केला. या छळामुळे सुप्रिया हिने राहत्या घरी गुरूवारी (ता.27) रोजी सायकांळी 7:30 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सुप्रियाचे वडील सुधीर लोमटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पती सुमित वाघमारे, सासु लताबाई वाघमारे, सासरा मधुकर वाघमारे व दीर सचिन वाघमारे यांच्या विरूध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. संजय गिते करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *