
वाळुज महानगर, ता.21) – छत्रपती सम्भाजीनगर शहरात या वर्षी पहिल्यांदाच डिजे मुक्त गणेश उत्सव साजरा करण्यात आला. गणेशोत्सव झाला. या डिजे मुक्त गणेश उत्सवाची जवळपास 80 टक्के जनतेने प्रशंसा केली. शिवाय मंत्री आणि लोकप्रतिनिधीची डीजे मुक्त उत्सवाची मागणी होती. तसेच उच्च न्यायालयानेही ध्वनि मर्यादा ठरवून दिली आहे. वाळूजमहानगरात 75 डिसिबल इतकी ध्वनि मर्यादा आहे. त्यामुळे या वर्षीच्या नवरात्र उत्सवातही डीजेवर बंदी आहे. यासाठी सर्वांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी केले.
एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या वतीने मासीआ सभागृह येथे शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी नवरात्र उत्सव निमित्त उत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर – परिमंडळ 1 यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी हा आनंदाचा उत्सव उत्साह आणि शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी सहायक पोलिस आयुक्त संजय सानप, वरिष्ठ पुलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, महावितरणच्या अधिकारी कोमल बोडरे यांनी उपस्थिताना नवरात्र उत्सवा विषयी आवश्यक सूचना व सुरक्षा व कायदेविषयक माहिती दिली. या बैठकीत पंचायत समिति सदस्य दीपक बढे, गणेश हीवाळे, जयश्री घाडगे, नंदा राजपूत यांनी नवरात्र उत्सव संबंधी सूचना व मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक पोलिस निरीक्षक सुषमा पवार यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक पोलिस निरीक्षक संजय गीते, पोलिस उप निरीक्षक शेख सलीम, अंमलदार बाबासाहेब काकडे, बाळासाहेब आंधळे, योगेश शेळके, अरुण उगले, आबासाहेब फलके, सचिन भदरगे यांनी परिश्रम घेतले. बैठकीस अवचित मोरे, नितीन जाधव, मनोहर सनेर, अधिक पाटील, प्रभाकर बढे, अलका दौड, जयश्री पाटिल, सुरेखा माने, रेखा काळे, मीना उसकेवाड, जया पवार, नागेश कोठारे यांच्यासह अनेकांची उपस्थिति होती.
