March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.30) – विनापरवाना व बेकायदेशिररित्या तलवार बाळगत असतांना 21 वर्षीय तरुणाला तसेच ही तलवार देणाऱ्या 23 वर्षीय तरुणास वाळुज एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून जेरबंद केले. तुमच्या ताब्यातून तलवारीसह दोन मोबाईल मिळून बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. वाळूज परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी सोमवारी (ता.29) रोजी 6:30 ते साडेआठ वाजेच्या सुमारास वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एक इसम हा बेकायदेशीर रित्या तलवार विक्रीसाठी गणेश वसाहत, हरीसिद्धी मंगलकार्यालयाजवळ येणार आहे. अशी माहिती वाळुज एमआयडीसी ठाण्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांना सोमवारी (ता.29) रोजी 6:30 वाजेच्या सुमारास माहिती मिळाली.
त्यानुसार छापा मारण्यासाठी पूर्ण तयारी करून
खाजगी वाहनाने जाऊन पोलिसांनी दबा धरला. मिळालेल्या माहितीतील ठिकाणी एक इसम संशयीत रित्या फिरतांना दिसला. त्याच्या हातामध्ये कपड्यात गुंडाळलेली एक काठीसदृश्य वस्तु होती. त्याला पोलिसांनी ताब्यात घेवुन नाव गाव विचारले असता त्याचे नाव अर्जुन राजेश दणके वय 21 वर्षे रा. साठेनगर बुद्धविहारजवळ वाळुज ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर असे सांगितले. त्यानंतर त्याची झडती घेतली असता कपड्यात गुंडाळलेली तलवार मिळुन आली. ही तलवार गुड चाऊस याची असुन त्याने माझ्याकडे ठेवण्यासाठी दिली. असे सांगितले. याशिवाय त्याच्याकडे मिळालेल्या मोबाईल मध्ये एका इसमाच्या हातात तलवार घेतलेली व्हिडीओ क्लीप मिळुन आली. त्याचे नाव गुड्डु चाऊस असल्याचे अर्जुन दणके याने सांगीतले. त्यानंतर पोलिसांनी 2 हजार रुपये किमतीची तलवार व पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करून गुड्डू चाऊस याची माहिती माहिती घेत रात्री 8:30 वाजेच्या सुमारास त्याच्या घरी छापा मारला. त्याला ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्याचे नाव साहिल बाबु चाऊस उर्फ गुड्डु चाऊस, वय 23 वर्ष, रा. भारत बेकरीच्या बाजूला गल्लीत, इंदीरानगर पंढरपुर असे सांगितले. त्याची अंग झडती घेतली असता खिशात मोबाईल मिळाला. त्या मध्ये साहिल चाऊस हा घोडयावर बसुन हातात तलवार घेतलेला फोटो दिसुन आला. हजार रुपये किमतीचा हा मोबाईल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी पोलिसा आमदार सुरेश भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी अर्जुन राजेश दणके रा. साठेनगर बुद्धविहार जवळ वाळूज व साहिल बाबु चाऊस उर्फ गुड्डु चाऊस रा. भारत बेकरी, बाजूच्या गल्लीत, इंदीरानगर पंढरपुर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *