
वाळूजमहानगर – विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. धामोरी बु. ता. गंगापूर येथील धामोरी बु विकास सोसायटीची निवडणूकगुरुवारी (ता.20) रोजी बिनविरोध झाली असून चेअरमनपदी तुकाराम आसाराम शेळके तर व्हाईस चेअरमनपदी काकासाहेब आसाराम शेळकें यांची निवड बिनविरोध झाली आहे.
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. धामोरी बु. ता. गंगापूर जि. औरंगाबाद या सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणुक सन 2022 ते 2027 या कालावधीसाठी प्राप्त नामनिर्देशनपत्रांची यादीत तुकाराम आसाराम शेळके, राजेंद्र भगवान शेळके, काकासाहेब आसाराम शेळके, कल्याण दत्तात्रय शेळके, सुभाष लक्ष्मण शेळके, नामदेव विनायक शेळके, शिवाजी बापुराव निरफळ, अल्काबाई लक्ष्मण शेळके, प्रभाकर गणपत वाघ, विक्रम नामदेव किर्तीशाही, लिलाबाई रामजी तांबे, सुलोचनाबाई परसराम कावळे यांचा समावेश आहे. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक किरण चौधरी व गट सचिव अशोक बरबडे यांनी काम पाहिले. यावेळी सोसायटी निवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या सर्व लोकप्रतिनिधीचे स्वागत करण्यात येऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
