February 5, 2026

 

वाळूजमहानगर – घानेगाव येथील सर्पमित्र लक्ष्मण गायके, दत्ता जाधव या मामा-भांजे यांना हिंगोली येथील प्रख्यात सर्पमित्र विजयराज पाटील त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात द रियल हिरो 2022 हा पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले.

वाळूज औद्योगिक परिसरातील घानेगाव येथील सर्पमित्र लक्ष्मण रामभाऊ गायके व दत्ता साईनाथ जाधव (मामामांजे) हे गेल्या अनेक वर्षापासून परिसरात विषारी, बिनबिगारी सर्वच जातीचे साप व वन्यजीव सहजरित्या पकडतात. तसेच जखमी झाल्यास त्यांच्यावर योग्य उपचार करतात. पकडलेले साप व वन्यजीन माणव वस्तीपासून दूर सुरक्षित जंगलात सोडून देतात. साप व वन्यजीव प्राण्यांविषयी असलेली भिती, समज, गैरसमाज जनजागृती करून दूर करतात. परिसरात घरी कुठेही साप किंवा वन्यजीव आढळ्यास नागरिक लक्ष्मण गायके व दत्ता जाधव यांना फोन करतात. त्यांच्या या कामाची दखल घेऊन प्रसिद्ध जगविख्यात सर्पतज्ञ, निलिमकुमार खैरे व सर्पतज्ञ डॉ. संजय नाकाडे यांच्या हस्ते हिंगोली येथे झालेल्या राज्य स्तरिय संमेलनाब ‘द रियल हिरो 2022 पुरस्कार देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील अनेक सर्पमित्र तसेच वन्यजीव रक्षक, प्रेमी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *