February 5, 2026

 

वाळुजमहानगर – गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने देशी बनावटीचा गावठी कट्टा जवळ बाळगून वाळूज औद्यगिक परिसरात गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही उल्लेखनीय कामगिरी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (DB) विशेष पथकाने सोमवारी 1 डिसेंबर रोजी रात्री केली.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे कारवाई करण्यासाठी गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सागर पाटील व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करीत असतांना सोमवारी 1 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास बजाजनगर येथील इद्रप्रस्थ कॉलनीजवळ दोन इसम संशयास्पद रित्या उभे दिसले. पोलीस आल्याची चाहुल लागताच तेथुन एक जण पळुन गेला. मात्र पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ एक देशी बनावटीचा गावठी कट्टा मिळुन आला. 15 हजार रुपये किमतीचा हा देशी बनावटीचा गावठी कट्टा पोलिसांनी जप्त करून जप्त करण्यात आला.

तसेच त्याच्या सोबत असलेला व पोलिसांना पाहून पळून गेलेल्या इसमाबाबत विचारले असता त्याचे नाव सचिन मिसाळ असे समजले. या दोघांनी वाळूज औद्यगिक परिसरात गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा जवळ बाळगल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुरेश भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी योगेश लक्ष्मण गिराम, (वय 31 वर्षे), रा. शिक्षकनगर, शिवनेरी कॉलनी रांजणगांव (शे.पु.) व सचिन भुंजगराव मिसाळ रा. राजंणगाव रांजणगांव (शे.पु.) ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त भागिरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, पोउपनि. प्रविण पाथरकर, पोलीस अहवालदार सुरेश कचे, पोलीस अंमलदार सुरेश भिसे, नितीन इनामे, राजाराम वाघ, समाधान पाटील, संदिप तागड, शिवनारायण नागरे, रोहीत चिंधाळे यांनी केली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *