March 24, 2026

वाळूजमहानगर, (ता.29) – पंढरपूर येथून घरी परतत असलेल्या एका महिलेचा पदर दुचाकीच्या चाकात अडकल्याने झालेल्या अपघातात ती दुचाकीवरून रस्त्यावर पडल्याने जखमी झाली. हा अपघात छत्रपती संभाजीनगर ते नगर हायवेवर वीस नंबर खोली जवळ गुरुवारी (ता.29) रोजी सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बगडी ता.गंगापूर येथील ज्ञानेश्वर लक्ष्मण हापसे आणि उषा लक्ष्मण हापसे हे पतीपत्नी छोटे पंढरपूर येथून दुचाकी (एमदुचाकीच्या चाकात पदर अडकला, महिला जखमी एच 20, ए एम – 9910) ने स्वग्रही परतत असताना 20 नंबर खोली जवळ उषा हापसे वय 35, रा. यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या मागच्या चाकात अडकून अपघातात झाला. गुरुवारी (ता.29) रोजी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात उषा हापसे गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच जखमींना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान विनामूल्य ॲम्बुलन्सने उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे दाखल केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *