March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.8) – हातगाडी ढकलत जाणार्या एका अनोळखी इसमास भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात दुचाकीस्वाराने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात हातगाडीधारक इसम गंभीर जखमी झाला. हा अपघात छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवर रेल्वे उड्डाणपूलाजवळील तिसगाव फाट्यावर गुरुवारी (ता.7) रात्री 9 वाजेच्या सुमारास झाला.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी (ता.7) रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास एक अनोळखी इसम हातगाडी ढकलत पंढरपूरकडून छत्रपती संभाजीनगरकडे जात होता. त्याचवेळी पाठीमागून भरधाव एक दुचाकी आली. आणि त्या दुचाकीस्वाराने हातगाडी ढकलणाऱ्याला जोराची धडक दिली. तीसगाव फाट्यावर झालेल्या या अपघातानंतर अपघातग्रस्ताला मदत न करता किंवा त्याला उपचारार्थ दाखल न करता दुचाकीस्वार पसार झाला. माणिक संतोष भोम्बे या प्रत्यक्षदर्शी रिक्षा चालकाने फोनवरून अपघाताची माहिती दिल्याने नानिजधामच्या रुग्णवाहिकेचे पायलट संदीप त्रिंबके यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमीला जिल्हा रुग्णालयत (घाटी) दाखल केले. मात्र अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमाची ओळख पटू शकली नाही. हा गंभीर जखमी झालेला इसम परप्रांतीय असावा. असे काही वाहनधारकांनी सांगितले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *