February 5, 2026


वाळुज महानगर, (ता.4) – शहीद भगतसिंह प्राथमिक शाळा सिडको महानगर 1 येथील 6 वी तील विद्यार्थी चि.साईराज शिवाजी काकडे याने (दिव्यांग गट) संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 53 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन गणोरी ता.फुलंब्री जि.छत्रपती संभाजीनगर येथे विकसित व आत्मनिर्भर भारतासाठी स्टिम या विषयावर विज्ञान प्रोजेक्ट बनवून दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये जिल्हयात प्रथम क्रमांक मिळवला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्याचे कौतुक करण्यात आले. तसेच या विद्यार्थ्यांची विभागीय पातळीवर निवड झाली आहे. शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण साक्रूडकर, उपाध्यक्ष दामोदर मानकापे व अण्णा सावंत, सचिव गंगाधर शेवाळे, शा. व्य. समितीचे अध्यक्ष संजय गौकुंडे यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच शहीद भगतसिंह प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी मानकापे, विज्ञान शिक्षिका शितल सातपुते तसेच इतर शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या विज्ञान प्रदर्शन सहभागामध्ये कु. वेदिका जाधव कु. गौरी वाकडे व विज्ञान शिक्षिका शीतल सातपुते यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *