March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.2) – दहेगाव बंगाल येथे महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समितीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत आकाश अप्पासाहेब खरात यांची डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष अजय गौतम खरात यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


यावेळी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा सर्वानुमते ठराव घेतला. या बैठकीतला उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव संदीप जाधव, ग्रामपंचायत सदस्य दिपक सुतार, पप्पु खरात, संतोष खरात, विशाल खरात, अक्षय खरात, शांतीलाल खरात, बाळु खरात, त्रिशरण खरात, राजु खरात, साजन खरात, विकास खरात, विक्रम खरात, संदिप खरात, महेश दळवी, धम्मदिप खरात, रावसाहेब खरात, सुरेश खरात, प्रकाश खरात, राहुल मनोहर, अनिल खरात, प्रतिक खरात, ज्ञानेश्वर खरात, प्रभाकर खरात, दादा खरात, अविनाश खरात, अशोक खरात, सतिश खरात, किरण खरात, राहुल खरात, आदी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *