
वाळुज महानगर, (ता.23)- जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने
बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात बुधवारी
(ता. 23) रोजी पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप हिंदू बांधवाना श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया, शहर प्रमुख विशाल खंडागळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. येणारा जाणार प्रत्येक नागरिक उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभाग नोंदवत होता शेवटी सर्वांच्या वतीने मौन बाळगत शांतता राखुन मृत नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी तिसगावचे माजी उपसरपंच तथा उपतालुकाप्रमुख वष्णू जाधव, श्रीकृष्ण राठोड, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य महेंद्र खोतकर, पाटोदाचे उपसरपंच कपिंद्र पेरे, दलित आघाडी तालुका अध्यक्ष अनिल जाधव, महिला आघाडी जेष्ठ कार्यकर्त्या मीराताई पाटील, शहरप्रमुख संगीता बनकर, उपतालुकाप्रमुख मीरा चव्हाण, अनिता लेंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य काकाजी जीवरग, बजरंग पाटील, उपशहर प्रमुख नामदेव सागडे, विभाग प्रमुख प्रवीण चंदन, शिवशंकर सगट, रतन नलावडे, त्रिंबक जगताप, विनोद दाभाडे, सतीश हिवाळे, रोहिदास चव्हाण, व्यापारी आघाडी जिल्हा प्रमुख सतीश अग्रवाल, युवासेना तालुका अधिकारी विजय वाडेकर, अमोल होर्शील, संतोष चंदन, शाखाप्रमुख नरसिंग ढगे, पंढरीनाथ चोपडे, दादासाहेब गोराडे, उपविभागप्रमुख लहू खराटे, शंकर दांडगे, समाधान ठोंबरे, नितीन कलांत्रे, अशोक कटारे, देवीदास पवार, अशोक मकासरे, नंदू जगताप, वैजिनाथ तुपे, अशोक मकासरे, रिक्षा आघाडीचे बद्रीनाथ दाभाडे, साहेबराव रणयेवले यांच्यासह शिवसैनिक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलिस अंमलदार बाबासाहेब आंधळे, योगेश शेळके, विक्रम वाघ, अरुण उगले आदींसह
पोलिसांचा मोठा पोलिस बंदोबस्त होता.
