March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.4) – नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदव्या घेता येऊ शकतात. त्याचबरोबर स्वयंरोजगार आणि उद्योजकतेवर आधारित नवीन अभ्यासक्रमाची निर्मिती यामध्ये झालेली आहे. विद्यार्थ्यांनी आता केवळ सरकारी नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वत:चा व्यवसाय उद्योग कसा उभा करता येईल. या अनुषंगाने शिक्षण व कौशल्य संपादित केले पाहिजे. असे मत डॉ शिंक कुमार सिंग यांनी व्यक्त केले.

बजाजनगर येथील दगडोजीराव देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये पदवी वितरण समारंभ बुधवारी (ता.2) रोजी उत्साहात झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील प्रोफेसर डॉ. सिंकूकुमार सिंग यांची उपस्थिती होती. तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल हजारे, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक सचिव विजय राऊत, स्थानिक नियमक मंडळाचे सदस्य विवेक जयस्वाल, संचालिका शिवानी राऊत, उपप्राचार्य डॉ. संजय सांभाळकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व विद्यापीठ ध्वज संचालन उपप्राचार्य डॉ. संजय सांभाळकर केले. तर डॉ संदीप पाथरीकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. युवराज धबडगे, प्रा सीमादेवी मुंडे, प्रा रमेश जायभाये, डॉ अनिल वाघ, प्रा. शंकर जामगे, प्रा. विशाल दखणे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *