वाळूजमहानगर, (ता.19) – सहलीहून परत येत असलेल्या विद्यार्थ्यांची भरधाव ट्रॅव्हल बस पुढील वाहनाला धडकून झालेल्या अपघातात विद्यार्थ्यांसह 7 शिक्षक जखमी झाले होते. गंगापूर वाळूज दरम्यान इसारवाडी फाटा येथे 11 जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघाता प्रकरणी कोचिंग क्लासेस चालकावरून टेम्पो ट्रॅव्हल चालकाविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात बुधवारी (ता.18) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना येथील सौदागर कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी व शिक्षक सहलीला गेले होते. ते परत येत असताना टेम्पो ट्रॅव्हल (एम एच 20 डीडी-0700) चा चालक आरोपी आनंदसींग राजुसींग राजपूत याने पुण्याकडून औरंगाबादकडे येताना त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून समोरील वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. गंगापूर वाळुज दरम्यान इसारवाडी फाटा येथे11 जानेवारी 2023 रोजी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलर मधील सहलीला गेलेले विद्यार्थी व शिक्षिका असे 7 जण जखमी झाले. या प्रकरणी अब्दुल मकिद मुजाहदे सौदागर (वय 25) रा.सराफनगर, जुना जालना याच्या फिर्यादीवरून आरोपी टेम्पो ट्रॅव्हल (एम एच 20 डीडी-0700) चा चालक आनंदसींग राजुसींग राजपूत रा.संजयनगर, बायजीपुरा,औरंगाबाद यांच्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख सलीम करीत आहे.
