March 25, 2026

वाळूजमहानगर, ता.26 – दुचाकी शोरुमच्या कर्मचार्यांनी ग्राहकाला समाधानकारक सेवा न दिल्याने एका ग्राहकाने रागाच्या भरात स्वत:ची दुचाकी पेटवून दिली. ही घटना मंगळवारी (ता.26) रोजी दुुपारी 4.30 वाजेच्या सुमारास बजाजनगर येथील धनलक्ष्मी होन्डा शोरूम मध्ये घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने शोरूम चालक आणि ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कुणाल डोंगे याने 4 मे 2024 रोजी बजाजनगर येथील धनलक्ष्मी होन्डा शोरुम मधुन दुचाकी खरेदी केली होती. दरम्यान काही दिवसांपुर्वी दुचाकीच्या मॅकव्हील मध्ये बिघाड झाल्याने ते बदलून घेण्यासाठी कुणाल डोंगे व अनिकेत भोसले असे दोघे मंगळवारी (ता.26) रोजी दुुपारी 4.30 वाजेच्या सुमारास शोरूममध्ये गेले होते. त्यावर शोरूमच्या कर्मचार्यांनी इन्शूरन्समधून मॅकव्हील बदलून देण्यासाठी कुणालकडे त्याचा वाहन चालवण्याचा परवाना मागण्यात आला. परंतु वाहन चालवण्याचा परवाना नसल्याने त्याने शोरूममध्ये गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्याच दरम्यान त्याने रागाच्या भरात दुचाकी खाली पाडून दुचाकीला आग लावली. त्यात दुचाकी जळून खाक झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तेथील कर्मचारी व ग्राहक गोंधळून गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा –
दरम्यान अनिकेत भोसले व कुणाल डोंगे हे दुचाकी खराब झाल्याने बजाजनगर येथील धनलक्ष्मी होन्डा शोरूममध्ये दुचाकी दुरुस्त करण्यासाठी घेऊन गेले होते. त्यावेळी दुचाकीचे कागपत्रे दाखवा या कारणावरून शोरूम मधील कर्मचार्रयांशी वाद झाला. त्यावेळी तेथील कर्मचार्रयांनी अनिकेत व कुणाल यांना हातचापाटाने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अनिकेत डोंगे याने दिलेल्या तक्रारीवरून धनलक्ष्मी होन्डा शोरूमच्या 4 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर घुसळे करित आहे.

 

लायसन नसल्याने पेटवली दुचाकी –
दुचाकीचे स्पेअर पार्ट खराब झाल्यास ते बदलून मिळते त्यासाठी इन्शुरन्स असतो. हा इन्शुरन्स पास होण्यासाठी दुचाकीधारकाकडे कागदपत्रे व लायसन्स असले पाहिजे. ते त्यांच्याकडे नसल्याने शोरूम मध्येच दुचाकी पेटवून दिली. अशी प्रतिक्रिया धनलक्ष्मी शोरूमचे चालक शशिकांत ढमढेरे यांनी दिली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *