वाळुज महानगर, (ता.15) – तुर्काबाद (खराडी) येथील 27 वर्षीय तरुणी घरातील कोणास काहीही न सांगता 7 वर्षीय मुलीसह 10 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बेपत्ता झाली.
कल्पना लक्ष्मण धोतरे वय 27 वर्षे रा. तुर्काबाद (खराडी) ता. गंगापूर, रंग सावळा, उंची 4 फुट, चेहरा गोल, शरिरबांधा सडपातळ, बोलीभाषा हिंदी, मराठी, अंगात काळ्या रंगाची साडी, पायात काळी चप्पल व चैन. असे तिचे वर्णन असून तिच्या सोबत 7 वर्षाची श्रुष्टी नावाची मुलगी आहे. याबाबत अनिल पिराजी धनवटे (28) रा. तुर्काबाद (खराडी) ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर यांनी खबर दिल्याने वाळूज पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. या महिलेबाबत कोणास काही माहिती असल्यास वाळुज पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस हवालदार डी. एस. खोसरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.