March 25, 2026


वाळूज महानगर, (ता.16) – तुर्काबाद (खराडी) परिसरात गुरुवारी (दि.15) रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास पूर्व मौसमी अवकाळी पाऊस झाला. यावेळी आकाशात विजेचा कडकडाड होऊन वीज पडल्याने दोन गाईंचा जागीच मृत्यू झाला.


तुर्काबाद (खराडी) परिसरात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. गुरुवारी (दि. 15) रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास परिसरात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांची त्रिधा तिरपट उडाली असून कांद्यासह अनेक शेती उत्पन्नाचे नुकसान झाले. यावेळी तुर्काबाद जवळील बोरगाव येथील संतोष तांबे यांच्या गाय गोठ्यावर वीज पडून दोन गाभण गायीचा जागीच मृत्यू झाला. त्यात अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे उपसरपंच बाळू तांबे सांगतात. संतोष तांबे हे दूध उत्पादक शेतकरी अजून त्यांच्याकडे मुक्त गाय गोठा आहे. या गोठ्यात 30 गायी होत्या.

अचानक आलेल्या पावसामुळे विजेचा कडकडाट होऊन वीज पडल्याने गायी सैरावैरा कळाल्या. या विजेच्या कचाट्यात दोन गायी सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा पंचनामा डोमेगाव सज्ज्याचे तलाठी धरमसिंग घुनावत, सरकारी पशु वैद्यकीय हॉस्पिटलचे डॉ. प्रमोद भालेराव, उपसरपंच बाळू तांबे, ग्रामपंचायत सदस्य देविदास तांबे, बाबासाहेब होले, दत्तू गायकवाड, जनार्दन तांबे, चंद्रभान कदम, गोरख तांबे, दूध डेअरीचे चेअरमन ताराचंद तांबे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *