February 4, 2026

वाळुज महानगर- तीसगाव शिवारात बांधकाम कामगारास बिबट्या दिसल्याने परिसरातील शेतकरी व नगारीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी दुपारी वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणुन घेतली. तसेच शेतकरी व नागरीकांना बिबट्या कसा बचाव करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या तिसगाव येथील शेतकरी हिरालाल सुर्यंवशी यांची गट नंबर 193, 194 मध्ये तीन ते चार एकर उसाचे क्षेत्र आहे. शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास बांधकामासाठी आलेल्या एका कामगाराला अचानक बिबट्या उसाच्या शेतात जाताना दिसला.

ही माहिती त्याने परिसरातील शेतकऱ्यांना दिली. दरम्यान माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत नागरीकांशी संवाद साधत बिबट्याच्या पाऊल खुणा विषयी माहिती जाणून घेतली. तसेच शेतकरी व नागरीकांना एकटे न फिरता दोन किवां तीघांनी एकत्र येऊन शेती कामे करावी.

 

असा सल्ला दिला. यावेळी बिबट्या तात्काळ जेरंबद करावा अशी मागणी डॉ भरतसिंग सलामपुरे, हिरलाल सुर्यंवशी, बेबीलाल सुर्यंवशी, सुरज सुर्यंवशी, रामलाल सुर्यंवशी, विक्की सुर्यंवशी, किशोर क्षत्रिय, मोहनसिंग सलामपुरे आदीनी केली आहे.

 

वनविभागाकडून प्रात्यक्षिके –
यावेळी दौलताबाद वन विभागाच्या प्रभुदास हजारे यांनी बिबट्या पासून बचाव कसा करावा. याबाबत प्रात्यक्षिके करून दाखवली. तसेच स्वसंरक्षणासाठी लांब काठीला थैले (कपडा) गुंडाळून यामध्ये खराब ऑइल व वाळलेल्या मिरच्या टाकून टेंभा पेटवून व फाटाके वाजवले. तर बिबट्या पळून जातो. जवळ काही नसेल तर मोबाईल असतोच मोबाईलवर जरी मोठ्या आवाजात गाणे वाजवले तरीसुद्धा बिबट्या पळून जातो. असे प्रात्यक्षिक करून दाखवत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी प्रभुदास हजारे यांच्यासोबत रेस्क्यू टीमचे सर्पमित्र शरद दाभाडे, नितेश जाधव, रवी मंडलिक, आकाश बत्तीशे, आनंद वाघमारे यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *