March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.20) – सिद्धीविनायक व्हॉलीबॉल क्लब व नितीन वावरे पाटील यांच्या वतीने भव्य खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा गट नंबर 99, तिसगाव, श्री सिद्धीविनायक विहार येथील मैदानावर होणार आहेत.

26 जानेवारी रोजी होणाऱ्या या स्पर्धेच्या पूर्व तयारीसाठी मैदान बनवण्यात येत आहे. या मैदानाचे विधिवत पूजा करून कामाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते व मुख्य आयोजक नितीन वावरे पाटील, तिसगाव ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव, उद्योजक अमित पांडे, अनिल पवार, नाईक काका, बबन गळधर, मिलिंद पाटील तसेंच सिद्धीविनायक व्हॉलीबॉल क्लबचे सदस्य अथर्व कुलकर्णी, शुभम हिवाळे, वंश वावरे पाटील, अजय तळणकर, कृष्णा कवडे, ओमकार कापसे, अमोल केरे, राहुल पवार, अमोल देशमुख, प्रीत बोर्डे, विनायक तळेकर, अनिकेत खरात, मयूर कळमकर, गणेश तायडे आदी उपस्थित होते. खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 11 हजार 1 व ट्रॉफी आणि मेडल तसेंच द्वितीय बक्षीस 5 हजार 1 व ट्रॉफी असे बक्षिसे राहणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक संघांनी शुभम हिवाळे, अथर्व कुलकर्णी व वंश वावरे पाटील यांच्याशी संपर्क साधावा. आवाहन करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *